Main Featured

संजय राऊत गोत्यात; सुशांतचा भाऊ ठोकणार अब्रुनुकसानीचा दावासुशांतसिंह याचा चुलत भाऊ आणि भाजपचे आमदार नीरज सिंह बब्लू यांनी याप्रकरणी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेना नेते संय राऊत यांनी 'सामना'तील 'रोखठोक' या सदरातून सुशांतचे वडील के. के. सिंह यांची दोन लग्ने झाल्याने सुशांत नाराज होता. त्यामुळे तो त्यांना भेटायलाही जात नव्हता असा दावा केला होता. त्यावर नीरज सिंह बब्लू यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. के. के. सिंह यांचं दुसरं लग्न झालं ही चुकीची माहिती आहे. सुशांत वडिलांवर नाराज होता हे राऊत यांना कुणी सांगितलं?, असा सवाल करतानाच लेखातील सर्व दावे निराधार असून या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं नीरज यांनी सांगितलं. राऊत यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्या जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ईडीच्या चौकशीत रियाने लपवला स्वतःचा अजून एक फोन नंबर

शिवसेनेचे नेते आणि मुंबईच्या महापौर बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी अशी विधाने करून त्याला राजकीय वळण देऊ नये. हे एक संवेदनशील प्रकरण आहे. त्याचा तपास होऊन त्याचं सत्य बाहेर यायला हवं, असंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी संपूर्ण देशाची मागणी आहे. त्यावर कुणाला हरकत नसावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

MUST READ
काय म्हणाले होते राऊत...

सुशांतसिंह राजपूत () प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांत हा गेल्या काही वर्षांत संपूर्ण मुंबईकर बनला. त्याचा बिहारशी संबंध नव्हता. सुशांतला सर्व वैभव मुंबईनेच दिले. त्याच्या संघर्षाच्या काळात बिहार पाठीशी नव्हता. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही.

एक गोष्ट सत्य आहे की, सुशांतचे त्याच्या पाटण्यातील वडिलांशी संबंध चांगले नव्हते. मुंबई हाच त्याचा ‘आशियाना’ होता. या सर्व काळात सुशांत वडील व इतर नातेवाईकांना किती वेळा भेटला, सुशांत किती वेळ पाटण्याला गेला ते समोर येऊद्या. अंकिता लोखंडे व रिया चक्रवर्ती या दोन अभिनेत्री तरुणी त्याच्या आयुष्यात होत्या. यापैकी अंकिताने सुशांतला सोडले व रिया त्याच्या सोबत होती. आता अंकिता रिया चक्रवर्तीविषयी वेगळे बोलत आहे. मुळात अंकिता व सुशांत हे वेगळे का झाले त्यावर प्रकाश पाडायला कोणी तयार नाही. तपासाचा तो एक भाग असायला हवा.