Main Featured

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणखी एक विक्रम




पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narednra Modi)यांच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. भाजपाचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान म्हणून पंतप्रधान मोदींनी विक्रम केला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. तसेच, सर्वात जास्त काळापर्यंत पंतप्रधान पदावर असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणून देखील पंतप्रधान मोदी यांनी विक्रम केला आहे.

Must Read




पंतप्रधान मोदी (PM narednra Modi) यांच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी हे सर्वात प्रदीर्घकाळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. तर, सलग २ हजार २५६ दिवस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान पदावर होते. १९ मार्च १९९८ रोजी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले होते. जे सलग २२ मे २००४ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. त्यांचा पहिला कार्यकाळ १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ पर्यंत होता. तर दुसरा कार्यकाळ १३ ऑक्टोबर ते २२ मे २००४ पर्यंत होता.
तर, सद्यस्थितीस देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेले नरेंद्र मोदी हे २ हजार २६० दिवसांपासून आजतागायत पंतप्रधान पदावर कायम आहेत. यामुळे सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावर राहिलले पहिले गैरकाँग्रेसी व भाजपा नेता म्हणून त्यांच्या नावे विक्रम झाला आहे. नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ २६ मे २०१४ पासून सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे. २०१४ मध्ये भाजपा प्रचंड बहुमत मिळवत देशात सत्तेत आली होती. त्यानंतर २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यांचा पहिला कार्यकाळ २०१९ मध्ये संपला होता. मात्र, पुन्हा एकदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवत सत्ता मिळवली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.
स्वातंत्र्यानंतर १९४७ पासून ते २०२० पर्यंत देशाला १५ पंतप्रधान मिळाले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे. ते ६ हजार १३० दिवस पंतप्रधान पदावर होते.
जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधी ५ हजार ८२९ दिवस पंतप्रधान पदावर होत्या. २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ म्हणजेच ११ वर्षे ५९ दिवस त्या सलग पंतप्रधान पदावर होत्या. त्यानंतर दुसऱ्यांदा १४ जानेवारी १९८० पासून ते ३१ ऑक्टोबर १९८४ पर्यंत पंतप्रधान पद त्यांनी सांभाळले.
इंदिरा गांधी यांच्या नंतर मनमोहन सिंग हे सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधान पदावर होते. ते यूपीए -१ व यूपीए -२ सरकारमध्ये २००४ ते २०१४ पर्यंत म्हणजेच १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्या नावावर ३ हजार ६५६ दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे.