Main Featured

अँबुलन्स अटेंडंटचा खुलासा, सुशांतच्या मृतदेहाविषयी सांगतली 'ही' महत्वाची गोष्ट सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये दरररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सुशांतचा मृतदेह आणणा-या अँबुलन्सच्या ड्रायवरनंतर आता त्याच्या अटेंडंटचा (Sushant Singh Rajput case) जबाब देखील समोर आला आहे. या अटेंडंटने हा देखील दावा केला आहे की पोलिसांच्या दबावामुळे तो सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. मात्र त्याने हे जरुर सांगितलं की जेव्हा पोलिसांच्या टीमसोबत तो सुशांतच्या रुममध्ये आला होता तेव्हा सुशांतची बॉडी कोणत्या अवस्थेत होती.
अँबुलन्स अटेंडंटने सांगितलं की, त्याने याआधी देखील अनेक आत्महत्या केलेले मृतदेह पाहिले आहेत. मात्र सुशांतचा मृतदेह पिवळा पडला होता. या अटेंडंटने(Sushant Singh Rajput case) असाही दावा केला आहे की सुशांतच्या मृतदेहाचे केवळ पाय वाकलेले नव्हते तर त्याच्या पायावर निशाण देखील होते. अटेंडंटने सुशांतच्या गळ्याभोवती असलेल्या निशाणावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. 

MUST READ


सुशांतच्या या केसमध्ये असं देखील म्हटलं जातंय की जेव्हा सुशांतने फाशी घेतली तेव्हा त्याचा बेड आणि त्याच्या पायामध्ये खूप कमी अंतर होतं. अशात जेव्हा त्याने फाशी लावली असेल तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली असेल. यासोबतंच फॉरेन्सिक(Sushant Singh Rajput case) रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं की सुशांतच्या गळ्याभोवती जे निशाण आहे ते त्याच कपड्याचं होतं ज्याने त्याने फास लावला होता. या गोष्टीवर अनेकांनी त्यांची वेगवेगळी मतं मांडली आहेत.