Main Featured

गॅस सिलिंडर मिळणार 50 रुपयांनी स्वस्त; असे करा Online बुकिंग


Amazon Pay will give cashback of 50 rs for Gas cylinders booking; see how | गॅस सिलिंडर मिळणार 50 रुपयांनी स्वस्त; असे करा Online बुकिंग


कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती खालवली आहे. अनेकांची नोकरी गेली आहे, तर अनेकांचा पगार कापण्यात आला आहे. अशावेळी(Gas Cylinder booking) घरातील महत्वाच्या वस्तू जसे की किराणा, दूध, पाणी, गॅस आदींसाठी पैसे तर लागतच आहेत. यामुळे 10 रुपये जरी एखाद्या वस्तूसाठी वाचले तरीही संकटग्रस्त लोकांसाठी ते पुरेसे आहेत. सिलिंडर बुक करताना देखील पैसे द्यावे लागतात. यामध्ये तुम्ही 50 रुपये वाचवू शकणार आहात. 

थेंबे थेंबे तळे साचेप्रमाणे प्रत्येक गोष्टीत काही पैसे जरी वाचले तरीही ती मोठी रक्कम ठरणार आहे. दर महिन्या दी़ड महिन्याला गॅस सिलिंडर (Gas Cylinder booking) बुक करावा लागतोच लागतो. आधी यासाठी मोठी लाईन लावावी लागत होती. आता घर बसल्या एक मिसकॉल दिला की गॅस सिलिंडर बुक होतो किंवा सिलिंडर पुरवठादार कंपन्यांचे अॅपही आले आहेत. 

सध्या गॅसच्या किंमती कमालीच्या वाढल्या (Do Online Booking)आहेत. एवढ्या की आता काँग्रेसच्या काळात जेवढ्या किंमतीला सिलिंडर मिळत होता त्यापेक्षा जवळपास दुप्पट दर झाला आहे. शिवाय सबसिडीमध्ये आता 8 सिलिंडर मिळतात. बाकीच्या सिलिंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तरीही हे सिलिंडर महाग झाले आहेत. जर तुम्हाला सिलिंडर त्यापेक्षा स्वस्त भावात हवा असेल तर यासाठी एक मार्ग आहे. 

Must Read


जर तुम्ही अ‍ॅमेझॉन पे (amazon pay) वरून सिलिंडर बुक केला तर तुम्हाला मोजलेल्या रकमेपैकी 50 रुपये परत मिळणार आहेत. अ‍ॅमेझॉन पे वर इंडेन, भारत आणि एचपी गॅस कंपन्या आहेत. तेथून बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 50 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. 

जाणून घ्या प्रक्रिया...
  • अ‍ॅमेझॉन पेच्या पेमेंट ऑप्शनवर जावे लागणार आहे. 
  • यानंतर गॅस सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी निवडावी लागेल. 
  • याठिकाणी तुमचा गॅस कंपनीला दिलेला मोबाईल नंबर किंवा एलपीजी नंबर टाकावा लागेल. 
  • तुमची माहिती आली की अ‍ॅमेझॉन पेला लिंक असलेल्य़ा य़ुपीआय किंवा डेबिट कार्डातून पैसे वजा होतील.
  • यानंतर काही वेळातच तुमच्या अकाऊंटमध्ये (Do Online Booking)50 रुपयांचा कॅशबॅक वळता केला जाईल. 
  • महत्वाचे म्हणजे ही ऑफर 31 ऑगस्टपर्यंत आहे. कंपनी पुढेही ही ऑफर वाढवू शकते.