Main Featured

'सडक 2' ट्रेलर; पहिल्यांदाच आलियाच्या चित्रपटाला लाखोंची नापसंती


'सडक 2' ट्रेलर; पहिल्यांदाच आलियाच्या चित्रपटाला लाखोंची नापसंती


बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर, अनेकांकडून चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि आलिया भट्टला (Alia Bhatt) सोशल मीडियावर सतत ट्रोल केलं जात आहे. सुशांतच्या चाहत्यांकडून या दोघांवर नेपोटिज्मचा (Nepotism) आरोप लावला जात आहे. याचदरम्यान आलिया भट्टच्या आगामी 'सडक 2' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि ट्विटरवर लोक #Sadak2dislike अशा प्रकारचा हॅशटॅग वापरुन आलियाला पुन्हा ट्रोल करु लागल्याचं चित्र आहे.

Must Read

12 ऑगस्ट रोजी 'सडक 2' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर त्याला केवळ 3 लाखांच्या आसपास लाईक केलं गेलं आहे. तर तब्बल 53 लाखहून अधिकांनी ट्रेलरला नापसंती दर्शवली आहे. आलियाने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी, हा पहिल्याच असा चित्रपट आहे ज्याला लोकांनी सर्वाधिक नापंसती दर्शवली आहे. ट्रेलरला डिसलाईक केलं आहे.