Vodafone आणि Airtel ग्राहकांसाठी मोठी बातमी, लवकरच बंद होऊ शकतात 'हे' प्लॅन

टेलिकॉम नियामक ट्राय (TRAI) लवकरच व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल ग्राहकांना जबरदस्त झटका बसणार आहे. या दूरसंचार कंपन्यांकडून ट्रायने प्रायोरिटी प्लॅन (Priority Plan) संदर्भात माहिती मागितली आहे. या माहितीबाबत सविस्तर उत्तर मिळाल्यानंतर दोन आठवड्यांत ट्राय हे प्लॅन बंद करण्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. ट्रायच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रायोरिटी प्लॅन संबंधित अनेक मुद्द्यांवर ट्रायकडे गंभीर चिंता असल्याचे सांगितले. ट्रायने दोन टेलिकॉम कंपन्यांना आजपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रायने कंपन्यांना विचारले होते की, तुमचे नेटवर्कमध्ये व्यस्त असल्यास प्रीमियम प्लॅन नसलेल्या ग्राहकांच्या आसपास प्रीमियम प्लॅन ग्राहक असतील तर अशा परिस्थितीत प्रीमियम नसलेल्या(Priority Plan)  ग्राहकांना कोणती सेवा मिळेल? ट्रायने दोन कंपन्यांच्या या योजनाबाबत सुमारे दोन डझन असे प्रश्न विचारले आहेत.

MUST READ


सूत्रांनी सांगितले की फक्त 'चांगली सेवा' हा शब्द वापरणे पुरेसे नाही. दरम्यान, या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी दोन दूरसंचार कंपन्यांनी आणखी काही वेळ मागितला आहे, असे सूत्रांनी सांगितले. ट्राय उत्तर मिळाल्यानंतर दोन आठवड्यांत प्रायोरिटी प्लॅनबाबत निर्णय देईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की Airtel आणि Vodafone Idea ग्राहकांना प्रीमियम प्रकारात मासिक आधारावर निश्चित रक्कम खर्च करण्याचे जाहीर केले होते.

कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना 4 जी नेटवर्कपेक्षा जास्त प्राधान्य देणे, वेगवान इंटरनेट गती प्रदान करण्यासह इतर अनेक फायदे ऑफर केले होते. यावर आक्षेप घेत ट्राय यांनी पहिल्या टप्प्यात कंपन्यांना समन्स (Priority Plan) बजावले होते, त्यावर कंपन्यांनी गेल्या महिन्यात ट्रायकडे आपली उत्तरे सादर केली. आता ट्रायने दोन्ही कंपन्यांकडून नवीन प्रश्न विचारले आहेत.