Main Featured

कोरोनामुक्त झालेली महिला 124 दिवसांनी आढळली पॉझिटिव्ह, देशातील पहिलेच प्रकरण



देशात कोरोनामुक्त झालेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरात राहणाऱ्या एका महिलेला 4 महिन्यांनी पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुक्त झालेला रुग्ण पुन्हा बाधित होण्याचे देशातील हे पहिलेच प्रकरण आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
अहमदाबाद येथील 54 (First case in the country)वर्षीय महिलेला पहिल्यांदा 18 एप्रिलला कोरोनाची बाधा झाली होती. यानंतर तिला कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर महिला कोरोनामुक्त झाली आणि तिला डिस्चार्ज देखील देण्यात आला. मात्र आता 124 दिवसांनी हीच महिला पुन्हा पॉझिटिव्ह आढळली आहे. देशातील असे हे पहिलेच प्रकरण असून महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आहे.
दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा मुलगा एअरफोर्समध्ये आहे. काही दिवसांपूर्वी तो पत्नी आणि 3 वर्षांच्या मुलासह दिल्लीवरून अहमदाबादला आईकडे आला होता. यानंतर महिला आणि तिच्या मुलाला ताप आल्याने चाचणी करण्यात आली, यात दोघेही पॉझिटिव्ह आढळले. मुलाला अहमदाबाद येथील डिफेन्स रुग्णालयात, तर आईला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात (First case in the country)आले. कोविड सेंटरमध्ये महिलेची अँटिबॉडी चाचणी घेण्यात आली आणि अहवाल निगेटिव्ह आला.
कोविड रुग्णालयाचे डॉक्टर प्रज्ञेश वोरा यांनी याबाबत सांगितले की, महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वाब पुन्हा(First case in the country) घेण्यात आला असून संशोधनासाठी पुण्यातील व्हायरलॉजी लॅबला पाठवण्यात आला आहे. तसेच आयसीएमआरला देखील याबाबत कळवण्यात आले आहे.