Main Featured

सुशांतच्या बहिणीपाठोपाठ या बॉलिवूड कलाकारांनी केली सीबीआय चौकशीची मागणी


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. मात्र त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी वारंवार केली जात आहेअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. मात्र त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी वारंवार केली जात आहेसीबीआय चौकशी व्हावी आणि सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने केली. तिने आपल्या सोशल मी़डियावर व्हिडीओ शेअर केला. आम्हाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे तिने यावेळी म्हटले आहेत्यानंतर अंकिता अंकिता लोखंडेनेही (ankita lokhande) अशी मागणी करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत #CBIforSSR ची मागणी केली आहे.सुशांतची जवळची मैत्रिण अभिनेत्री क्रिती सॅनन हिने देखील, सत्य लवकरच बाहेर येईल असा विश्वास दाखवला आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी क्रितीने देखील केली आहे.अभिनेता वरूण धवन याने देखील #CBIforSushant अशी स्टोरी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहेसुशांतची कोस्टार अभिनेत्री परिणिती चोप्राची देखील अशी मागणी आहे की, या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावाअभिनेत्री मौनी रॉय देखील सीबीआय चौकशी व्हावी या मागणीबरोबर आहे. तिने सोशल मीडियावर तशी पोस्ट केली आहे
सुशाांतच्या कुटुंबीयांना हे समजणे गरजेचे आहे की नेमके काय घडले, अशी पोस्ट करत अभिनेता सुरज पांचोलीन सीबीआय चौकशीची मागणी केली आहेसुरुवातीपासून अभिनेता शेखर सुमन याने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जावा ही मागणी जोर लावून धरली होतीअभिनेत्री कंगना रणौत हिने देखील सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयनेच करावा अशी मागणी केली आहे.