Main Featured

वडील माझी हत्या करू शकतात, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत मागितली पोलिसांकडे मदत
टीव्ही सिरीयल आणि दक्षिणेकडील चित्रपटात काम केलेली भिनेत्री तृप्ति शंखधर (वय- 19) हिने  (Actress Tripti Shankdhar) वडिलांकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून ही भीती व्यक्त केली आहे. ‘वडील राम रतन शंखधर हे माझे लग्न त्यांच्या आवडीच्या व्यक्तीशी करण्यास उत्सुक असून मी असे न केल्यास मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे’, असा आरोप तृप्ति शंखधर हिने केले आहेत.
तृप्ति शंखधर हिने मंगळवारी रात्री (Ask police for help)इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईत मनोरंजन क्षेत्रात कारकीर्द बनवण्यासाठी जे पैसे दिले होते, ते पैसे देखील वडील परत मागत आहेत. तसेच वडिलांच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न न केल्यास मला ठार मारण्याची धमकी दिली. वडील मला मारहाण करतात असा आरोपही तिने केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने बरेली पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

Must Read


दरम्यान, तृप्ति शंखधर हिचे(Ask police for help) वडील बांधकाम व्यासायिक आहेत. या व्हिडीओवर अद्याप त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. बरेली पोलिसांनी याबाबत अद्याप लिखित स्वरूपात तक्रार मिळाली नसल्याचे म्हटले आहे. व्हिडीओबाबत काही तास आधीच माहिती मिळाली असून तपास सुरू आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.