Main Featured

अभिनेत्रीने केला आत्महत्येचा प्रयत्न


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री विजयलक्ष्मीने आत्महत्येचा (Suicide)प्रयत्न केला आहे. नैराश्यात येऊन विजयलक्ष्मीने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून विजयलक्ष्मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या तणावाचं कारण सांगितलं होतं. त्यामुळे सध्या विजयलक्ष्मीची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.


अलिकडेच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात तिला काही राजकीय व्यक्तींमुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याचं म्हटलं होतं. “गेल्या चार महिन्यांपासून मला सीमान आणि त्यांच्या पक्षाकडून मानसिक त्रास होत आहे. परंतु, माझ्या कुटुंबासाठी मी लढत आहे. पण आता हे सगळं सहनशक्तीच्या पलिकडे गेलं आहे.

Must Readतसंच हरि नादरनेदेखील मला प्रचंड अपमानित केलं आहे. मी रक्तदाबाच्या गोळ्यांचं सेवन केलं आहे. त्यामुळे काही वेळातच माझा रक्तदाब कमी होईल आणि मी मरण पावेन”, (Suicide) असा व्हिडीओ विजयलक्ष्मीने (Vijayalakshmi) शेअर केला होता.


दरम्यान, विजयलक्ष्मी (Vijayalakshmi) दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या तिच्यावर चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसंच सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.