Main Featured

कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो


aap tweet photo claim yogi adityanath meeting corona chiefsecretary play game | कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 22 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 45,257 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वच राज्यांत अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत. व्हायरसचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये ही अशीच एक टीम तयार करण्यात आली आहे. कोरोना आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोरच मुख्य सचिव टॅबवर गेम खेळत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे.  
आपचे खासदार संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील कोरोनासंदर्भातील कामकाजावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीमध्ये मुख्य सचिव टॅबवर गेम खेळत असल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये योगी आदित्यनाथ आढावा बैठकीमध्ये राज्यातील परिस्थितीसंदर्भात तपशील घेत आहेत. त्याच दरम्यान मुख्य सचिव टॅबवर गेम खेळत असल्याचं दिसत आहे. 

Must Read'मी बरोबर म्हणालो होतो, योगींनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नाही तर क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी टीम 11 बनवली आहे. पाहा योगीजी कोरोना व्हायरससंदर्भातील बैठक घेत असताना त्यांचे प्रमुख सचिव गेम खेळत आहेत' असं फोटोसहीत ट्विट संजय सिंह यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी टीम तयार केली असून त्याला टीम 11 असं म्हटलं जात आहे. 


कोरोना बैठकीदरम्यान अधिकारी गेम खेळत असलाचा दावा आपच्या नेत्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमधील ही कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. राज्यात दोन हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील रुग्णांचा आकडा 22,68,676 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 53,601नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 871 जणांचा मृत्यू झाला आहे.