Main Featured

आदित्य ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?

Aditya Thackeray

Indian politics- महाविकास आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)सध्या चर्चेत आहेत. यामागील कारण म्हणजे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये केलेला बदल ठरत आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटर प्रोफाइवरुन ‘महाराष्ट सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री’ हे शब्द काढून टाकले आहेत. यामागे नेमकं काय कारण आहे यावरुन चर्चा रंगली आहे.


आदित्य ठाकरे यांनी अचानक ट्विटर प्रोफाइलमध्ये बदल कऱण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण यानिमित्ताने आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सरकारमधून बाहेर पडणार की त्यांना नवीन जबाबदारी दिली जाणार आहे अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना किंवा आदित्य ठाकरे यांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं (Indian politics)नाही.

Must Read


सुशांत सिंह प्रकरणी (Sushant singh rajput Suicide case) वारंवार आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात आहे. विरोधक थेटपणे आदित्य ठाकरेंचं नाव घेणं टाळत असले तरी अप्रत्यक्षपणे वारंवार त्यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे. आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. सोबतच सुशांत सिंह प्रकरणी चौकशी सुरु असलेल्या रिया चक्रवर्तीनेही आपण आदित्य ठाकरेंना ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी केलेला बदल कशामुळे आहे हा प्रश्न विचारला जात आहे.