Main Featured

मुंबईत अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे


aaditya-thackeray-press-meet

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्याचा(Term of Abhay Yojana till 31st December 2020) निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असे राज्याचे पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Must Read


यासंदर्भात आमदार सुनील प्रभु यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे (Guardian Minister Aditya Thackeray)यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विनंतीनुसार मुंबई महापालिकेने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत 12 ऑगस्ट रोजी संपणार होती. मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा 2 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. (Term of Abhay Yojana till 31st December 2020)अभय योजनेअंतर्गत 2 टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. मुंबईकरांना आता 31 डिसेंबर 2020 पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुंबई महापालिकेचे तसेच मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे पालकमंत्र्यांनी आभार मानले आहेत.