Main Featured

शासनाच्या निर्बंधानुसारच उत्सव सर्वांनी साजरा करावा : पोलिस उपअधिक्षक डॉ. अभिनव देशमुखGanesh Chaturthi 2020: Worshiping Lord Ganesha will remove all ...

इचलकरंजी येथे सध्या उद्भवलेल्या कोविड संकटाच्या काळात सर्वच सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा. सार्वजनिक मंडळांची श्री मूर्ती चार फुटाची तर घरगुती श्री मूर्ती दोन फुटाची असावी. शासनाच्या निर्बंधानुसारच हा उत्सव सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस उपअधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे. गणेशोत्सव मंडळांना गणपती आगमन व विसर्जनादिवशी मिरवणूक काढता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्याला मंडळांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार उडविला आहे. गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने करावा असे आवाहन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पोलिस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी इचलकरंजीसह शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

ते म्हणाले, सार्वजनिक मंडळांनी स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका ग्रामपंचायतीची परवानगी घेऊनच मंडप घालावा. लहान मंडप घालून भागात स्वच्छता विषयी प्रबोधन करावे. या काळात मंडळांनी उत्सव साजरा करताना आरोग्यविषयक जनजागृती करावी. उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करतानाच मंडळांनी वर्गणीसाठी जबरदस्ती करू नये. मंडपामध्येच सोशल डिस्टन्सचे पालन करत भजन, कीर्तनाच्या माध्यमातून माध्यमातूनही जनजागृती करावी. मंडळांनी आपल्या भागातच विसर्जनासाठी कुंड तयार करावे. मंडळे व घरगुती गणपती यांना एकत्रितपणे गणपती विसर्जन करता येणार नसल्याने नागरिकांनी आपल्या परिसरातच कृत्रिम तलाव तयार करून श्रींचे विसर्जन करावे.

मंडळानी गणेशोत्सव काळात रक्तदान शिबिर व अन्य आरोग्य विषयी कार्यक्रम घेऊन शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करावा असेही पोलिस अधिक्षक देशमुख यांनी सांगितले.