Main Featured

कारखान्यातील रखवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या


तारदाळ (ता. हातकणंगले) येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्कच्या कारखान्यातील रखवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. नामदेव सत्ताप्पा तरवाळ असे त्याचे नाव असून या प्रकरणाची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील गणेशनगर परिसरातील 25 वर्षीय नामदेव तरवाळ हा तारदाळ येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्कमधील एका कारखान्यात रखवालदार म्हणून काम करत होता. मंगळवारी सकाळी या कारखान्यालगत असलेल्या झाडाला त्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भागातील नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी त्याला खाली उतरवून तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनास्थळी आत्महत्या की घातपात अशी चर्चा ऐकावयास मिळत असल्याने शहापूर पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.