Main Featured

शहराबरोबरच परिसरातील गावांमध्येही कोरोना बाधीतांची शृंखला सुरूचCorona: Caught in corona crossfire: How the current crisis has ...


इचलकरंजी येथे मागील दीड महिन्यापासुन शहरात सुरु असलेली कोरोनाची शृखला कायम असून  गुरुवारी शहरात  2 डॉक्टर, नगरसेविकास व त्यांचा पती अशा तब्बल 78 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.  बाधीत डॉक्टरांपैकी एक स्वामी मळ्यातील असुन दुसरे जवाहरनगरमधील आहेत. त्यामुळं शहरातील बाधीतांची संख्या 1659 झाली आहे. बाधीतांपैकी चार जणांचा  मृत्यू झाल्यानं बाधीत मृतांची संख्या 82 झाली आहे. तर 581 जणांनी कोरोनावर मात केली आहे.आज दिवसभरात तोरणा नगर,संभाजी नगर,सिद्धेश्वर हौसिन्ग सोसाइटी परिसरातील पुरुष आणि गुरुक्ंनन नगर येथील महिला यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान शहराबरोबरच परिसरातील गावांमध्येही कोरोना बाधीतांची शृंखला सुरूच आहे. कबनुरमध्ये आज 11 जणांची भर पडल्यानं बाधीतांची संख्या 106 वर पोहचली आहे. तर हुपरी इथं आज सहाजणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानं बाधीतांची संख्या 333 झाली आहे. कोरोची इथंही तिघांना कोरोनाची लागण झाल्यानं बाधीतांची संख्या 67 वर पोहचली आहे.