Main Featured

गणेशोत्सव वर्गणीतून गोरगरीबांना मदत करुन एक आदर्श निर्माण करावा : माजी नगरसेवक महेश ठोकेइचलकरंजी येथे सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान सुरु आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा. खर्चाला फाटा देत जमा होणार्‍या वर्गणीतून कोरोनाबाधितांसह गोरगरीबांना मदत करुन एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन माजी नगरसेवक महेश ठोके यांनी सार्वजनिक मंडळासह शहरवासियांना केले आहे.

मागील पाच महिन्यापासुन जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. त्यामध्ये भारत देशातही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून आपल्या इचलकरंजी शहरात तर दररोज कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. उद्योग, व्यवसाय, खाजगी कंपन्या सर्वच बंद राहिल्याने सर्वांवरच उपासमारीची वेळ आली. तर नोकर्‍या गेल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. उद्योजकांपासून कामगारांपर्यंत सर्वांनाच कोरोनाचा फटका बसला आहे. हातावरचे पोट असणार्‍यांची अवस्था अत्यंत हलाखीची बनली आहे.