Main Featured

डीकेएएससी कॉलेजचे कामकाज रोखून धरत निषेध व्यक्तAdmission In Government Schools Without Slc


इचलकरंजी येथे शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी मनमानी फी आकारली जात असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी नवीन युवक सेनेच्या वतीने डीकेएएससी कॉलेजचे कामकाज रोखून धरत निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाची दखल घेत शिक्षणाधिकार्‍यांनी व्यवस्थापनाला अशाप्रकारचे कोणतेही शुल्क न आकारण्याबाबत सूचना दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

शाळा, महाविद्यालयात शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून फी आकारण्याचा नियम नाही. पण इचलकरंजी आणि परीसरातील शाळा, महाविद्यालयांकडून त्यासाठी मनमानी पध्दतीने 150 ते 500 रुपये फी आकारली जात होती. सध्या कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचण निर्माण झाला असताना स्वामी विवेकानंद संस्थेच्या डीकेएएससी कॉलेजकडून बिल्डिंग डेव्हलपमेंट नांवाखाली शाळा सोडण्याचा दाखला देण्यासाठी 150 रुपये आकारले जात होते. दाखला देण्यासाठी फी आकारू नये या संदर्भातील नवीन युवक सेनेच्यावतीने शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निवेदनही दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकार्‍यांनी असे कोणतेही बेकायदेशीर शुल्क आकारू नये अन्यथा कारवाई करु असे प्राचार्य कुंभार यांना दिले असतानाही पुन्हा मनमानीपणे फी आकारत असलेच्या निषेधार्थ नविन युवक सेनेच्यावतीने महाविद्यालयाचे कामकाज रोखून धरत निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनाची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देत कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याबद्दल सुचना दिल्या. त्यानंतर फी न घेताच विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यास सुरवात केली. सदर आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष संतोष कांदेकर, अतुल नवनाळे, योगेश चव्हाण, रोहीत शिंदे, विवेक मोरे, प्रविण जानवेकर सहभागी झाले होते.