Main Featured

बहुजन आघाडीचे मुख्य बसस्थानकासमोर डफली बजाव आंदोलनKankavli ST bus stand | Mapio.net
इचलकरंजी येथे  कोरोना पार्श्‍वभूमीवर  एस.टी.ची प्रवाशी वाहतुक बंदच असल्याने नागरीकांची गैरसोय होत आहे. म्हणून राज्यातील एस.टी. आणि महानगरातील सार्वजनिक बस सेवा  सुरू करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडीने इचलकरंजीत मुख्य बसस्थानकासमोर डफली बजाव आंदोलन केले.

मागील चार महिन्यापासुन कोरोनमुळे जिल्हा बंदीमुळे  राज्यातील एस.टी. आणि महानगरातील बससेवा बंद ठेवण्यात  आली आहे. त्यामुळे  नागरीकांची गैरसोय होत आहे. शासन या संदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यास तयार नाही. या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या या भूमिकेचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने  राज्यभर आंदोलन पुकारले होते.  त्याच अनुषंगाने आज येथील मुख्य बसस्थानकासमोर डफली बजाव आंदोलन करण्यात आलं.


आंदोलनात युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शरद कांबळे, नाना पारडे, रावसाहेब निर्मळे, शितल माने, भारत कांबळे, रावसाहेब फरांडे, डी.एस. डोणे, प्रदिप कांबळे, राणी सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.