Mia Kalifa, The Porn Industry, And Why Her (Lack Of) Earnings ...


लेबेनॉनची राजधानी असणाऱ्या बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटामधून देश अजून सावरलेला नाही. जगभरामधून लेबनॉनसाठी मदतीचा ओघ सुरु असतानाच पॉर्नस्टार मिया खलिफानेही  (Pornstar Mia Khalifa) लेबेनॉन स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी आपल्या चष्म्याचा लिलाव केला आहे. मियाने चष्म्याचा लिलाव करुन लेबेनॉनसाठी ७४ लाख ८५ हजारहून अधिक रुपयांची रक्कम जमा केली आहे.
४ ऑगस्ट रोजी बैरुतमध्ये झालेल्या स्फोटात १७८ जणांचा मृत्यू झाला असून सहा हजार जण जखमी झाले आहेत. या स्फोटामधील जखमींना मदत करण्याची आपली इच्छा असल्याचे मियाने तिच्या इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं होतं. “मी थोडं क्रिएटीव्ह होण्याचा प्रयत्न करतेय. एखाद्या कामासाठी मतदनिधी उभारण्यासाठी वेगळे मार्ग निवडले जाऊ शकतात. मात्र यामुळे मूळ समस्या आणि हेतूवरुन आपले लक्ष विचलित होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे,” असं मियाने म्हटलं होतं.
Must Read

मियाने यासंदर्भातील पोस्ट करताना, “आपल्याला शक्य असेल तितका निधी आपण गोळा केला पाहिजे. सध्या लेबेनॉन रेड क्रॉसला आपल्या मदतीची गरज आहे. तुम्हाला या गोष्टी विकत घेण्यात सर नसेल तर तुम्ही थेट लेबेनॉन रेड क्रॉसच्या वेबसाईटवर निधी दान करु शकता,” असं म्हटलं आहे.