Main Featured

राज्यात चोवीस तासांत ३४६ पोलीस करोनाबाधित, दोघांचा मृत्यू
करोना विषाणू संसर्गाचा देशभरात विस्फोट झाल्याचे दिसत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या आता ३३ लाखांपेक्षाही पुढे गेली आहे. तर, राज्यातही करोनाचा ससंर्ग अद्यापही वाढताना दिसत आहे. राज्यातील सामान्य नागरिकांबरोबरच (346 police coroned in 24 hours)करोना योद्धे जमल्या जाणाऱ्या पोलिसांनाही दिवसेंदिवस करोनाचा अधिकच संसर्ग होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात आणखी ३४६ पोलीस करोनाबाधित आढळले असून, दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १४ हजार ६४१ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ७४१ जण, करोनामुक्त झालेले ११ हजार ७५२ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १४८ जणांचा समावेश आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
राज्यातील १४ हजार ६४१ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ५५५ अधिकारी व १३ हजार ८६ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ७४१ पोलिसांमध्ये ३५३ अधिकारी व २ हजार ३८८  (346 police coroned in 24 hours)कर्मचारी आहेत.

Must Read

करोनामुक्त झालेल्या ११ हजार ७५२ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार १८७ व १० हजार ५६५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १४८ पोलिसांमध्ये १५ अधिकारी व १३३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मागील दोन दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ७५ हजारांपेक्षा जास्त संख्येने वाढत असल्याचे दिसत आहे.आरोग्य  (346 police coroned in 24 hours)मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाख ८७ हजार ५०१ इतकी झाली आहे. मागील २४ ताासंत ७७ हजार २६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.