Main Featured

इचलकरंजीत गुरुवारी दिवसभरात 21 रुग्णांची भर, तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

वस्त्रनगरीत इचलकरंजीत गुरुवारी दिवसभरात 21 रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर जावून पोहोचली आहे. तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मागील महिन्याभरापासून कोरोना महासंकटामुळे इचलकरंजीतील कोारोना बाधितांची संख्या पाचशेसमीप पोहचली आहे. त्यामध्ये आजअखेर 81 जणांनी कोरोनावर मात केली असून उपचारादमर्‍यान 32 जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज वाढत चालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे बाधितांवर उपचार आणि बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची सोय असा दुहेरी प्रश्‍न प्रशासनाला सतावत आहे.


बुधवारी रात्री उशीरा आणखीन तिघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर गुरुवारची सुरुवात दत्तनगरमध्ये रुग्ण आढळल्याने झाली. त्यानंतर मंगळवार पेठ, गोसावी गल्ली, कोल्हापूर नाका, लालनगर, टाकवडे वेस, पिराचा मळा, गार्डन हॉटेल परिसर, पाटील मळा आदी परिसरात समुह संसर्गातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. महिन्याभरात शहरात दररोज दुहेरी आकड्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय विलगीकरण रुग्णालय केले असून डीकेटीई, अल्फोन्सा व व्यंकटेश्‍वरा हायस्कूल ही कोविड सेंटर आहेत. पण त्याठिकाणी जागेची उपलब्धता नसल्याने बाधितांना उपचार देण्यास तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींनी ठेवण्यात प्रशासनला अडचणी येत आहेत. आजअखेर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 495 वर पोहचली असून उपचारादरम्यान आजअखेर 32 जणांचा मृत्यू झाला आहे. 81 जण बरे होऊन घरी परतले असून सध्या 381 जणांवर उपचार सुरु आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशीही शहरात शुकशुकाट जाणवला. तर विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत होता.