Main Featured

Warrior Aaji चा VIDEO Viral



Actor ritesh deshmukh share video on instagram


कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown) अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणाचं काम बंद, कुणाचे पगार कापले, कुणाची नोकरी गेली. कित्येकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. हातावर पोट असलेल्यांचे तर हालच होत आहेत. पोट भरण्यासाठी रस्त्यावर कसरत करणाऱ्या अशाच एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अभिनेता रितेश देशमुखने (Actor ritesh deshmukh) हा व्हिडीओ शेअर केला आहे.


Must Read



रितेश देशमुखने (Actor ritesh deshmukh share video on instagram)  आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ही महिला लाठीकाठी खेळताना दिसते आहे. आपलं कौशल्य सादर करत ती पोट भरण्याचा प्रयत्न करत आहे. रितेश देशमुखनं या वृद्ध महिलेला वॉरिअर आजी (Warrior Aaji) असं म्हटलं आहे.





A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on


कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील अशा अनेक परप्रांतीय मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी आपल्या गावाची वाट धरली. यावेळी अभिनेता सोनू सूद त्यांच्या मदतीला आहे. त्याने या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याची सोय गेली. शिवाय आता त्यांच्याच गावात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही दिलं आहे.