Main Featured

‘पास नहीं तो फेल नहीं’; ‘शकुंतला देवी’मधील पहिलंवहिलं गाणं प्रदर्शित
विविध अभ्यासपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर कायमच अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री विद्या बालन (vidya balan) लवकरच ‘शकुंतला देवी’  (shakuntala devi) या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ‘सुलू’ असो किंवा मग ‘बेगमजान’ प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांना आश्चर्यचकित करत असते. त्यातच आता ती प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं (vidya balan movie shakuntala devi first song release)आहे.

Must Read

‘शकुंतला देवी’ या चित्रपटातील पास नहीं तो फेल नहीं’ हे पहिलंवहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात विद्या पहिल्यांदाच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली (vidya balan movie shakuntala devi first song release)आहे. वर्गात बसून गणित किती सोपं आहे हे विद्या या गाण्यातून विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे.“शकुंतला देवी चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित करताना मनस्वी आनंद होत आहे. पास नहीं तो फेल नहीं हे गाणं खरंच मला फार आवडलं असून ते माझ्या जवळ जाणारं आहे. आकड्यांसोबत संवाद साधण्याची एक मजेशीर पद्धत या गाण्यातून समोर आणण्यात आली आहे. गणित या विषयाचा फोबिया दूर करण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. हा खूपच गमतीशीर पद्धतीने शिकवण्याचा अनुभव आहे. मुलांसोबत हे व्हर्चुअल सेशन करताना आणि त्यांच्यासोबत हा मंच शेयर करताना खूप आनंद आला. हा एक वेगळा परंतु चांगला अनुभव होता”, असं विद्या म्हणाली.
दरम्यान,सुनिधी चौहानच्या (Sunidhi Chauhan)आवाज स्वरबद्ध झालेलं हे गाणं सचिन-जिगर या जोडीने कंपोज केलं आहे. तर प्रसिद्ध गीतकार वायू यांनी लिरिक्स दिल्या आहेत. या गाण्यात या चित्रपटात ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा विद्याच्या मुलीची भूमिका साकरत आहे. त्यासोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.