Main Featured

Video: मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 'Sea lion'; पुढे जे घडलं तुम्हीच पाहा...


Video: 'Sea lion' caught in fishermen's net; See for yourself what happened next | Video: मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला 'Sea lion'; पुढे जे घडलं तुम्हीच पाहा...मच्छिमारांना खोल समुद्रात जाऊन पंधरा-पंधरा दिवस बोटीवरच मुक्काम करून मासेमारी करावी लागते. ही पंधरा दिवस त्यांच्या आयुष्याला वेगवेगळी कलाटणी देणारी, अनेक संकटांचा सामना करायला लावणारी असतात. त्याची कल्पना समुद्र किनारी उभं राहणारा करू शकत नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात मच्छिमारांच्या जाळ्यात भलामोठा सी लायन अडकला आणि त्यानंतर त्याला बोटीवरून हुस्कावून लावण्यासाठी मच्छिमारांची चांगलीच तारांबळ उडाली. 
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे सांगणं अवघड आहे. यात मच्छिमार समुद्रात टाकलेले जाळे बोटीवर ओढताना दिसत आहेत. सुरुवातीला जाळ्यात अडकलेले मासे पाहून मच्छिमारही प्रचंड खुश झालेले पाहायला मिळत आहेत. आज तर लॉटरीच लागली, असं कदाचीत त्यांना वाटत असावं. पण, जेव्हा ते जाळं उघडलं जातं, तेव्हा समोर महाकार सी लायन उभा पाहून सर्वांचीच तारांबळ उडते. पुढे काय होतं, ते व्हिडीओ पाहूनच कळेल.