Main Featured

299KM/h वेगानं सुसाट पळवली सुपरबाईक, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO


299KM/h वेगानं सुसाट पळवली सुपरबाईक, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEOनुसतं 100 ते 120 च्या वर दुचाकीचा स्पीड speed of the bike गेला तरीही अनेकदा धाकधूक होते. तर एका तरुणानं शंभर तर सोडाच 300 च्या वेगानं दुचाकी पळवल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटकातील बंगळुरू इथला हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. रस्ते अपघाताच्या दुर्घटना घडत असताना अशा पद्धतीनं वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुसाट बाईक चालवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
हा तरुण बंगळुरुमध्ये लॉकडाऊनदरम्यान lockdown उड्डाणपुलावरून 300च्या वेगानं सुपरबाईक चालवत होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 1 मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये आपण दुचाकीवरचा स्पीड पाहिला तर आपल्याच काळजात धस्स होईल. सोशल मीडियावर यामाहा आर1 (Yamaha R1) ही सुपरबाईक बॅन करण्याची मागणी या घटनेनंतर अनेक युझर्सनी केली आहे.
बंगळुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. व्हायरल व्हिडीओच्या आधारे या व्यक्तीचा शोध घेतला असून त्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात अशा प्रकारची सुसाट स्पीडमध्ये जाणाऱ्या एका दुचाकी चालकानं स्टंट केले होते. त्यालाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी घटना समोर आली आहे.