Main Featured

गुप्तांगातून स्वॅब घेणे प्रकरण: शिवसेना व एमआयएम नगरसेवक आक्रमक, हॉस्पिटसमध्ये तोडफोड


गुप्तांगातून स्वॅब घेणे प्रकरण: शिवसेना व एमआयएम नगरसेवक आक्रमक, हॉस्पिटसमध्ये तोडफोड

कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणीच्या  गुप्तांगातून स्वॅब घेणे प्रकरण आता चांगलेच पेटलं आहे. या प्रकरणी शिवसेना व एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये जाऊन तोडफोड केली आहे. (Shiv Sena and MIM corporators have become aggressive).संतप्त नगरसेवकांची हॉस्पिटलमधील साहित्याची तोडफोड केली. कॅबिनच्या काचा फोडल्या.
दुसरीकडे खासदार नवनीत राणा या देखील संतप्त झाल्या असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
24 वर्षीय तरुणीचा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर अमरावती जिल्हात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आता घटनेवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या घटनेनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच संतप्त झाले आहे. तर आता पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी मी रोडवर (Shiv Sena and MIM corporators have become aggressive)उतरणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. महिला आधीच सक्षम झाल्या आहेत, त्यामुळे मी खासदार झाले तर देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील झाल्यात, असेही नवनीत राणा म्हणाल्या. अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोविड रुग्णांचे हाल होत आहे, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
Must Read
1)कोविड सेंटरवर क्वारंटाईन पोलीस कर्मचाऱ्याचा नशेत धिंगाणा, पळून जाण्याची धमकी

2)बापरे! क्वारंटाइन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं 50 लाख, पैसे भरणार कोण?

3)मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात- इकबाल चहल

4)रियाकडून सुशांतचा छळ, त्याला ब्रेकअप करायचा होता; अंकिताचा धक्कादायक खुलासा

5)आणखी एक दिलासा देणारी बातमी! देशात 10 लाखहून अधिक रुग्णांचा कोरोनाविरुद्ध लढा यशस्वी

कोणाचीही हयगय केली जाणार नाही...
राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही या प्रकरणी दखल घेतली आहे. कोणाचीही हयगय केली जाणार नाही. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
पीडित तरुणी अमरावती येथे आपल्या भावाकडे राहते. येथील एका मॉलमध्ये ही तरुणी काम करते. काही दिवसांपूर्वी याच मॉलमधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्यात आली. या पीडित तरुणीची 28 जुलै रोजी ट्रामा केअर सेंटरमध्ये स्वॅब घेण्यात आला. मात्र आरोपी अशोक देशमुखने रिपोर्ट पॉझिटिव्ह आले (Shiv Sena and MIM corporators have become aggressive)असून यरिन तपासणी करावी लागेल, असे तरुणीला सांगितले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणी आपल्या एका महिला सहकाऱ्यासह तेथे पोहचली. त्यांनी महिला कर्मचारी नाही का? असे विचारले. त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगत स्वत: तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. त्यानंतर टेक्निशियनने चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले. तरुणीला गुप्तांगातील स्वॅब टेस्टवर संशय आला, म्हणून तिने डॉक्टरांकडे याबाबत चौकशी केली. डॉक्टरांनी अशी कोणतीही चाचणी घेतली जात नसल्याचे सांगितले.

तरुणीने भावासह अशोक देशमुख या तरुणाबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अशोक देशमुखला अटक केली. त्याच्यावर बलात्काराच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात (Shiv Sena and MIM corporators have become aggressive)आला आहे.