Main Featured

धक्कादायक! मुख्यमंत्र्यांसमोर नस कापून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
भाजपचे (BJP)नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांचा शपथविधीचा कार्यक्रम हरयाणाताली रोहतक जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर ही आले होते. यावेळी ही घटना घडल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. धनखड यांच्या शपथविधी कार्यक्रमात एका व्यक्तीने आपल्या पायाची एक नस कापून आत्महत्येचा प्रयत्न (Attempt suicide)केला. या घटनेत ती व्यक्ती रक्तभंबाळ झाली. पोलिसांनी त्याला पकडून रुग्णालयात दाखल केलं.

Must Readमुख्यमंत्र्यांसमोर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीचे नाव राजवीर असं (Attempt suicide)आहे. तो कंसाळा गावचा रहिवासी आहे. यापूर्वीही त्याने असा प्रयत्न केला होता. काही वर्षांपूर्वी तो व्यसनमुक्ती केंद्र चालवत होता. पण काही जणांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्रकरण मिटवण्यासाठी त्याने लाचही दिली. आपल्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी त्याने पोलीस अधीक्षकांसह पोलीस महानिरीक्षकांपर्यंत तक्रा केली. पण काही उपयोग झाला नाही, असं राजवीरचा आरोप आहे.
गेल्या वर्षीही एसपी कार्यालयाबाहेर राजवीरने दोन्ही पायांची नस कापून घेतली होती. त्यानंतर त्याला तातडीने पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने यापूर्वी अशी प्रकारचा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसंच त्याने पोलिसांवर केलेले आरोप फोटाळण्यात आले आहेत. त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.