Main Featured

शेतात उघड्यावर तीनपानी जुगार खेळणार्‍या नऊजणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील शेतात उघड्यावर तीनपानी जुगार खेळणार्‍या नऊजणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जमीर खुदबुद्दीन मकानदार (वय 30), किरण रमेश जाधव (वय 26), अमोल पांडुरंग तांबवे (वय 34), नरेंद्र आण्णा काळे (वय 35), हिवरा शिवाजी पुजारी (वय 27), निलेश ध्यानसेन माने (वय 36), संदीप बाबुराव माने (वय 33), तानाजी मल्लू कोळी (वय 40) व चंद्रकांत केरबा खांडेकर (वय 32, सर्व रा. तारदाळ) अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईत त्यांच्याकडून 12 हजार 400 रुपयांची रोकड जप्त केली आहे.