Main Featured

आता प्रियंका आणि दीपिकाची मुंबई पोलीस करणार चौकशी, हे प्रकरण भोवण्याची शक्यता


आता प्रियंका आणि दीपिकाची मुंबई पोलीस करणार चौकशी, हे प्रकरण भोवण्याची शक्यतासोशल मीडिया युजर्स आणि सेलिब्रिटींसाठी त्यांच्या फॉलोअर्सची संख्या खूप महत्त्वाची असते. सोशल मीडियावरील फॉलोअर्सवरून एखाद्या सेलिब्रिटीच्या स्टार व्हॅल्यूचा अंदाज लावता येतो. अशा वेळी सोशल मीडियावर फेक फॉलोअर्सचे देखील प्रमाण वाढत आहे. दरम्यान मुंबई क्राइम ब्रँचने फेक सोशल मीडिया फॉलोअर्स स्कॅमची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. जसाजसा याबाबतचा तपास पुढे जात गेला, त्यानंतर काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सर्वात मोठा खुलासा भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या  अभिनेत्री दीपिका पदूकोण (Deepika Padukone) आणि प्रियंका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) यांच्यासंदर्भात समोर आला आहे. या दोन्ही अभिनेत्री आणि इतर 10 सेलिब्रिटींचे नाव फेक फॉलोअर्सच्या यादीमध्ये समोर आले आहे.
फेक फॉलोअर्सना इन्स्टाग्रामच्या भाषेत "Bots" बोललं जाते. ज्या माध्यमातून स्टार्स किंवा अन्य हाय प्रोफाइल लोकं त्यांचे फॉलोअर्स वाढवतात, जे की खरेदी केले जातात. या खुलाशानंतर लवकरच मुंबई पोलीस प्रियंका आणि दीपिकाची चौकशी करू शकतात. न्यूज वेबसाइट डीएनएच्या मते, येणाऱ्या आठवड्यात ही चौकशी होऊ शकते. याप्रकरणी साधारण 150 लोकांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. मुंबई क्राइम ब्रँचने काढलेल्ंया या यादीमध्ये अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि काही अन्य हाय प्रोफाइल व्यक्तींचा समावेश आहे.
मुंबई पोलीस या सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येबाबत त्यांची चौकशी करू शकतात. पोलीस त्यांना हे फॉलोअर्स खरे असल्याचे सिद्ध करण्या संदर्भात विचारू शकतात. याप्रकरणी आतापर्यंत 18 लोकांची चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्या लोकांची चौकशी झाली आहे ते बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी संबधित आहेत. यामध्ये कलाकारांव्यतिरिक्त निर्माते, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, कोरिओग्राफर आणि सहदिग्दर्शकांचा देखील समावेश आहे.