Main Featured

शेअर बाजार कोसळला ; नफेखोरीने निर्देशांकांच्या घोडदौडीला ब्रेक


आज सकाळपासून बाजारावर विक्रीचा दबाव होता. रियल्टी, बँकिंग आणि वित्त सेवा क्षेत्रात विक्रीचा मारा सुरु होता. वाहन उत्पादकांची जूनमधील सुमार विक्रीने गुंतवणूकदार निराश झाले. त्यांनी आज ऑटो शेअरची विक्री केली. ज्यामुळे टीव्हीएस मोटर, टाटा मोटर्स, हिरो मोटो कॉर्प आदी शेअर घसरले. आज आशियातील इतर शेअर बाजारांमध्ये तेजी वातावरण होते. हाँगकाँग, चीन, सिंगापूर, जपान आदी शेअर बाजार तेजीसह वधारले.


मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर आज ३० पैकी २२ शेअर घसरणीसह बंद झाले. ज्यात एल अँड टी, नेस्ले, ऍक्सिस बँक, टेक महिंद्रा, एचडीएफसी, ओएनजीसी, भारती एअरटेल, रिलायन्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक, पॉवरग्रीड, एशियन पेंट, मारुती, इन्फोसिस या शेअरमध्ये घसरण झाली. इंडसइंड बँक, एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, आयटीसी, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक आदी शेअर तेजीसह बंद झाले. मंगळवारी निफ्टीने १० हजारांच्या पुढची पातळी कायम राखली. तो ३६ अंकांनी वधारला आणि निफ्टी १०,७९९.६५ अंकांवर स्थिरावला. बीएसई सेन्सेक्स १८७.२४ अंकांनी वाढला व ३६६७४ अंकावर विसावला.


गुंतवणूकदारांनी विदेशी भांडवल बाजारांतील चढउताराकडे फारसे लक्ष न देता गुंतवणूक केल्यामुळे बाजार वर गेले. विदेशी भांडवलाचा ओघ कायम राहील आणि देशात मान्सून चांगल्या प्रकारे सक्रिय राहील, या आशेवर भांडवल बाजार गेले काही दिवस तेजीत होते. जागतिक कमाॅडिटी बाजारात आज कच्च्या तेलाच्या किंमतीत १३ सेंट्सची घट झाली. तेलाचा भाव प्रती बॅरल ४२.९५ डाॅलरपर्यंत खाली आला.

देशभरात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात एकूण २४ हजार २४८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर २४ तासांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या आहे ४२५. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या ६ लाख ९७ हजार ४१३ वर पोहोचली असून आता पर्यंत देशात एकूण १९ हजार ६९३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेकडून 'एच १-बी' व्हिसाला स्थगिती देण्यात आल्यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांचे होणारे नुकसान मर्यादित आहे. या कंपन्यांचे एकूण १,२०० कोटी रुपयांचे नुकसान यामुळे होणे अपेक्षित असून या कंपन्यांच्या नफ्यावर २५ ते ३० टक्केच परिणाम होणार असल्याचे क्रिसिल या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.