Main Featured

‘टायगर सीरिज’च्या तिसऱ्या चित्रपटासाठी सलमान-कबीर खान करणार एकत्र काम?salman khan

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman khan)आणि दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan)यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘एक था टाइगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता टायगर सीरिजच्या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या सांगण्यावरुन सलमान आणि कबीर खान पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Must Read

टायगर सीरिजमधील हा चित्रपट अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. याबाबात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
टायगर सीरिजमधील पहिला चित्रपट ‘एक था टायगर’ २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. त्यानंतर टायगर सीरिजमधील दुसरा चित्रपट ‘टायगर जिंदा है’चे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते. हा चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झाला होता. आता लवकरच या सीरिजमधील तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी असल्याचे पाहायला मिळते.


नुकताच कबीर खान आणि सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच हा चित्रपट आजही जपानमधील काही चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येत आहे असे कबीरने पोस्टमध्ये म्हटले होते.
लवकरच सलमानचा (Salman Khan)‘राधे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करोना व्हायरसमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सलमानने चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आहे. या चित्रपटात दिशा पटाणी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
तर कबीर खानचा ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पदूकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.