Main Featured

सलमान-कतरिना येणार एकत्र?Bollywood Actor Salman Khan and actress katrina kaif come back together

चित्रपटाच्या कथेसोबतच त्यामध्ये कोणते कलाकार काम करत आहेत, हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच काही ऑनस्क्रीन जोड्यांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान (Bollywood Actor Salman Khan)आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ (Tiger 3)चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 
Must Read

मनीष शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने (Bollywood Actor Salman Khan) टायगर ३ साठी होकार दिला आहे. त्याच्यासोबत कतरिना (Actress Katrina Kaif) या चित्रपटात काम करणार आहे. पुढच्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून त्यात अॅक्शनचा पुरेपूर भरणा असेल. सलमान-कतरिनाची जोडी पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर ठरेल”, अशी माहिती चित्रपट व्यापार विश्लेषकाने दिली.
मनीष शर्मा यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘फॅन’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.