Main Featured

दिवसभरात प्राप्त अहवालात तब्बल 74 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह


मागील काही दिवसापासून दम टाकलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी पुन्हा उसळी घेतली. दिवसभरात प्राप्त अहवालात तब्बल 74 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. यामध्ये 61 जणांचा शासकीय तर 13 जणांचा खाजगी लॅबचा अहवाल आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने साडेपाचशेचा टप्पा ओलांडला आहे. आजच्या अहवालात डॉक्टरसह लहान मुलांचा समावेश आहे. मागील महिन्याभरापासून अखंडीतपणे सुरु असलेल्या इचलकरंजी शहरातील कोरोनाची श्रृंखलेने आज मोठी उचल घेतली. गुरुवारी रात्री पाचशेच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने केवळ पाचशे नव्हे तर साडेपाचशेचा टप्पा पार केला. काल रात्री ही संख्या 497 वर पोहोचली होती. मागील शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल 88 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा 74 वर पोहोचला. त्यामध्ये 61 जणांचा शासकीय तर 13 जणांचा अहवाल खाजगी लॅबमधून प्राप्त झाला आहे. आज मिळालेल्या अहवालात अयोध्यानगर, दत्तनगर, विकासनगर, शांतीनगर, लालनगर, संग्राम चौक, सांगली रोड, काडापुरे तळे, गुरूकन्नननगर, मेघदुत हॉटेल, प्रियदर्शनी कॉलनी, गणेशनगगर, थोरात चौक परिसर यासह शहराच्या विविध भागातील बाधीतांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 556 झाली आहे. त्यापैकी 32 बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.