
यापूर्वी माहिती प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी 50 टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. सुरुवातीला 25 टक्के जागा आणि नियमांचे काटेकोर पालन करून सिनेमा हॉल सुरू करावे, अशी मंत्रालयाची इच्छा आहे. एवढेच नाही तर अनलॉक -3 मधील सिनेमा हॉलसोबत जिम देखील (What will happen after July?) उघडण्यात येण्यावर चर्चा सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि मेट्रो उघडण्याच्या दृष्टीने विचार केला गेला नाही.
Must Read
मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मार्चमध्ये देशभरात लॉकडाऊन लादण्यात आला. 30 जून रोजी अनलॉक-1 अंतर्गत लादलेला लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. त्यानंतर, अनलॉक -2 1 जुलैपासून सुरू झाला. 31 जुलै रोजी संपणार आहे. सध्या अनलॉक -3बाबत चर्चा सुरू आहेत.(What will happen after July?) असा विश्वास होता की यावेळी शाळा आणि महाविद्यालये उघडण्याबाबत विचार केला जात आहे, परंतु गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता सरकार याबाबत चिंतेत आहे.
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच
देशात कोरोनानं थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 48 हजार 661 नवीन रुग्ण सापडले, तर 705 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 झाली आहे.(What will happen after July?) यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण निरोगी झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताचा रिकव्हरी रेट 63.9% झाला आहे.