Main Featured

घरगुती गणेशमूर्तींची मिरवणुका काढू नका


ganesh festivalकरोनाचा पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने Mumbai Municipal Corporation यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांच्या सुरक्षेसाठी खास आवाहन केले आहे. घरगुती गणेशमूर्तींच्या आगमनाला मिरवणुका न काढता जास्तीतजास्त पाच व्यक्तींनी एकत्रित जाऊन मूर्ती आणावी. तसेच संपूर्ण चाळीतील व इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

- घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी व या मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू, संगमरवर मूर्तींचे पूजन करावे.

- आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे व कुटुंबियांचे करोनापासून संरक्षण करावे. आगमनप्रसंगी मास्क, शिल्ड, सॅनिटायझर, सुरक्षित वावर व स्वसंरक्षणाची साधने काटेकोरपणे वापरण्यात यावीत.

- दर्शनास येणाऱ्या व्यक्तींना मास्क परिधान करण्याचा आग्रह धरावा. तसेच त्यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.

- गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे.
read-1)पंचायत, शिक्षण विभागातील ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या 2)भारताचा चीनला आणखी एक झटका; सरकारी खरेदीत चिनी कंपन्यांवर बंदी 3)जीएसटीत २०.५५ कोटींची तूट 4)लॉकडाऊनमध्येही श्रेयासाठी राजकीय धडपड

- नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाणे शक्यतो टाळावे. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत-कमी थांबावे.

- शक्यतो लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये.

- पालिका, पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

- घर, इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करावे.

- प्रत्येक वेळेस मास्क, शिल्ड, सॅनिटायझर, सुरक्षित वावर बंधनकारक आहे.

... तर कायदेशीर कारवाई

करोनाचा फैलाव होईल, अशी कोणतीही कृती उत्सव प्रसंगी करू नये. अन्यथा अशा व्यक्तींवर साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

....
विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास...

भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा २०२१च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणे शक्य आहे. त्यासाठी मूर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून घरीच मूर्ती जतन करुन ठेवता येईल, असे आवाहन पालिकेने केले आहे.