Main Featured

आजपासून पुणे, पिंपरी- चिंचवड अनलॉक


आजपासून पुणे, पिंपरी- चिंचवड अनलॉकसातत्यानं वाढणाऱ्या CORONAVIRUS  कोरोना रुग्णांची संख्या पाहता काही दिवसांपूर्वी PUNE पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं गेलं. ज्यानंतर आता शुक्रवारी म्हणजेच २४ जुलै २०२० ला लॉकडाऊनचे हे नियम शिथील करण्यात येत आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून लागू केलेल्या या लॉकडाऊनला शिथील करतेवेळी काही महत्त्वाचे नियम पिंपरी - चिंचवड आणि पुणे या भागांमध्ये लागू असणार आहेत. त्यामुलं नागरिकांनी सतर्कता बाळगत प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 
Lockdown लॉकडाऊन शिथील करतेवेळी सदर भागामध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये लॉकडाऊनचे नियम अद्यापही लागू असतील. तर, त्याव्यतिरिक्त इतर भागांमध्ये भाजी मंडई, फळ बाजार, आणि इतर दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 
शहरातील दुकानं ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील. पी1 आणि पी2 म्हणजेच सम- विषम तत्त्वाअंतर्गत ही दुकानं खुली राहणार आहेत. त्याशिवाय लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी सलून आणि ब्युटी पार्लर ज्या तत्त्वांअंतर्गत कार्यरत होते, त्याचनुसार ते सुरु राहतील.