Main Featured

धक्कादायक! डॉक्टरला खासगी रुग्णालयानं उपचारासाठी दिला नकार
जिथे डॉक्टरलाच कोरोनासाठी उपचार घ्यायला रुग्णालयाचे दरवाजे खटखटावे लागतात तिथे सर्वसामान्यांचे काय हाल? कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरचा वेळेत उपचार न मिळाल्यानं कोरोनामुळे (#coronavirus)मृत्यू झाला आहे. हजारो कोरोनाग्रस्त आणि नागरिकांना जीवदान देणाऱ्याला डॉक्टरला मात्र उपचारासाठी रुग्णालयाच्या खेट्या घालाव्या (private hospital refuses treatment of corona doctor) लागल्या.

Must Read
रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर मंजूनाथ यांना कोरोनावर उपचार करण्यासाठी तीन खासगी रुग्णालयांनी नकार (private hospital refuses treatment of corona doctor)दिला. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यानं अखेर त्यांना बंगळुरूमधील मेडिकल कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचारासाठी तात्काळ दाखल करावं लागलं. यावेळी उपचारादरम्यान कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. मंजुनाथ हे रामनगर जिल्ह्यात प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये नोकरी करत होते. यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडी. त्यांना ताप येऊ लागला. 25 जूनला ताप आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्यानं उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यानंतर कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं उपचारासाठी नकार देण्यात आला.
डॉ. मंजुनाथ यांना कोरोनावर (#coronavirus) उपचार घेण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात जाऊन चौकशी केली मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं खासगी रुग्णालयात अॅडमिट करुन घेण्यास तीनही रुग्णालयांनी नकार दिला. मंजुनाथ यांच्या कुटुंबातील आणखीन 6 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही डॉक्टर असल्यानं अशा प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. त्यापेक्षा आम्ही मजूर असतो तर बरं झालं असतं असा खेद डॉ. मंजुनाथ यांच्या भावाने व्यक्त केला आहे.