Main Featured

पंतप्रधान मोदींचा व्यावसायिकांना इशारा


पंतप्रधान मोदींचा व्यावसायिकांना इशारा; भारतातील गुंतवणुकीबाबत केलं मोठं वक्तव्यपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडिया आयडियाज परिषदेत (PM Modi India Ideas Summit 2020) तरुणांना संबोधित केले. यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. यावेळी मोदींनी गुंतवणुकीचे फायदे सांगितले. त्यांनी सांगितलं की कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणुकीची शक्यता आहे. यावेळी मोदी म्हणाले भारतात गुंतवणूक करण्याचा याहून चांगली वेळ असू शकत नाही.
यूएस-इंडिया बिजनेस कौन्सिल यांनी या समिटचं आयोजन केलं आहे. या वर्षी यूएस-इंडिया बिजनेस कौन्सिलच्या गठनाला 45 वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने खास कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पीएम मोदींनी या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेच्या लोकांना संबोधित केलं.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
-भारतात आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केलं जात आहे. भारताचं हेल्थकेअर सेक्टर 22 टक्के वेगाने पुढे जात आहे
-भारतात एनर्जी सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केलं जात असून भारत स्वत:ला गॅस बेस्ड इकॉनॉमीमध्ये बदलत आहे. या भागात अमेरिकेच्या कंपन्यांना मोठी संधी मिळेल.
-भारतात इन्फ्रास्टकचर सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. भारत आतापर्यंत सर्वात मोठा इन्फ्रास्टकचरल निर्माण करीत आहे.
-पीएम यांनी डिफेंस आणि स्पेस सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याचं आमंत्रण दिलं असून डिफेंसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एफडीआयची मर्यादा वाढवून 74 टक्के केली आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी व्यावसायिकांना भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं आहे. या समिटमध्ये भारत व अमेरिकेतील बड्या लोकांचा सहभाग होता. दुसरीकडे देशात रेल्वे, बँकांचा खासगीकरण होत आहे. याला अनेकांनी विरोध दर्शविला आहे.