Main Featured

अमेरिकेत करोनानंतर 'या' आजाराचा हाहाकार

करोनाचा आजार (#CORONAVIRUS) झालेल्या रुग्णांची संख्या ४० लाखांच्या घरात पोहचली असताना आता अमेरिकेत आणखी एका आजाराने डोकेवर काढले आहे. या आजारामुळे अमेरिकेत (New Virus Found in America) ६०० हून अधिकजण आजारी झाल्याने खळबळ उडाली आहे. हवाबंद सॅलडच्या पाकिटातून हा आजार पसरला आहे.

हवाबंद सॅलड पाकिटामध्ये आइसबर्ग लेटस, गोभी आणि गाजर असतात. सायक्लोस्पोरियासिस हा परजीवी विषाणू सॅलडमध्ये आढळला (outbreak of cyclospora infections linked to bagged salad)आहे. साइक्लोस्पोरा आजाराची सुरुवातीचे रुग्ण मे महिन्यात आढळले होते. त्यानंतर जुलै महिन्यात या आजाराशी निगडीत रुग्णांची संख्या वाढली. जॉर्जिया, आयोवा, इलिनोइस, मिनेसोटा, पेन्सिल्वियासह ११ राज्यांमध्ये हा आजार पसरला आहे. रुग्णांच संख्या ६०० हून अधिक झाल्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून आजाराचा तपास सुरू केला आहे.


Must Readफ्रेश एक्स्प्रेस या कंपनीने ही सॅलडची पाकिटे बाजार आणली होती. अमेरिकेतील अनेक मोठ्या रिटेल स्टोरमध्ये याची विक्री होते. अन्न आणि औषध प्रशासनाने लोकांना हवाबंद पाकिटामधील सॅलड न खाण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय रेस्टोरंट, किरकोळ विक्रेत्यांनाही ग्राहकांना सॅलड न देण्याची सूचना केली आहे. प्रशासनाकडून विक्रीस ठेवण्यात आलेल्या सॅलडच्या पाकिटांची तपासणी सुरू करण्यात आली (outbreak of cyclospora infections linked to bagged salad)आहे.

सायक्लोस्पोरियासिस सूक्ष्म परजीवींशी संबंधित आजार आहे. भूक न लागणे, पोट फुगणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा आणि अतिसार अशी या आजाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे साधारणत: पॅकेटमधील अन्न किंवा पाणी प्यायल्यानंतर एका आठवड्यांनी दिसतात.दरम्यान, जगभरात दीड कोटींहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, सहा लाखांहून अधिकजणांचा मृ्त्यू झाला आहे. तर, जवळपास ९५ लाखांहून अधिकजणांनी करोनावर मात केली आहे. 

करोनाची (#coronavirus)पहिली लाट आशिया आणि दक्षिण अमेरिकेत वाढत असून करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावला असून आतापर्यंत ३९ लाख करोनाबाधित आढळले असून एक लाख ४० हजार जणांचा मृ्त्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझील आणि भारतात सर्वाधिक करोनाबाधित आढळले आहेत