Main Featured

मल्लिका शेरावतला पाहण्यासाठी चाहत्यांनी केलं ट्रॅफिक जॅम
आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली मल्लिका शेरावत (mallika sherawat viral videoबॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. मल्लिका सध्या सिनेसृष्टीत फारशी सक्रिय नाही. मात्र तरीही तिच्या लोकप्रियतेत जराही कमतरता आलेली नाही. आजही तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. मल्लिकाची लोकप्रियता दाखवणारा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


Must Readमल्लिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ती गाडीतून प्रवास करत असताना कुठल्याश्या कारणामुळे तिची गाडी थांबली. त्यावेळी मागच्या सीटवर बसलेल्या मल्लिकाला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली. या गर्दीमुळे चक्क वाहतुक कोंडीची परिस्थिती उद्भवली होती. “तुमच्याकडून मिळणारं हे प्रेम पाहून मी भावूक झाले”, अशा आशयाची कॉमेंट तिने या व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत (mallika sherawat viral videoआहे.
मल्लिका शेरावर (mallika sherawat )बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. २००२ साली ‘जीना सिर्फ मेरे लिये’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘ख्वाहिश’, ‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट’, ‘गुरु’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने काम केलं. दरम्यान ‘मर्डर’ या चित्रपटामुळे तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात तिने अभिनेता इमरान हाश्मीसोबत केलेले इंडिमेट सीन तुफान चर्चेत होते.