Main Featured

9 वी आणि 11 वीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, राज्य सरकारचा नवा निर्णय


9 वी आणि 11 वीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, राज्य सरकारचा नवा निर्णयराज्यातील इ. 9वी आणि इ. 11वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे तोंडी परीक्षा घेऊन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आज करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून एक संधी प्राप्त होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना चालू शैक्षमिक वर्षात आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा नापास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) दररोजची सगळीच कामे आता बदलून गेली आहेत. प्रत्येकाल आता जास्त काळजी घ्यावी लगात आहे. सगळ्यांना चिंता आहे ती विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाची.
सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनावर उपाय असल्याने शाळेत पूर्वीसारखं आता जाता येणार नाही. ही परिस्थिती किती दिवस असेल याचाही अंदाज अजुन कुणालाच नाही त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी Online classes सुरू केले आहेत. त्यामुळे मुलं तासंतास आता मोबाईलसमोर राहात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर पालक संघटना आणि तज्ज्ञांनी नियमावली जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. (guidelines for online classes ) त्यामुळे Online classesच्या नावावर काही शाळांनी सुरू केलेल्या मनमानीला चाप लागणार आहे.
कोरोनामुळे बाहेर खेळण्यावर मुलांना बंधणं आली आहेत. त्यात सगळाच अभ्यास ऑनलाईन असल्याने मुलं मोबाईल आणि लॅपटॉप समोर बसून राहत आहे. त्यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याविषयी पालकांना चिंता वाटत होती. त्यामुळे तज्ज्ञांच्या शिफारसीनंतर केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने हे नवे नियम जाहीर केले आहेत.