Main Featured

राज्यात आजही उच्चांकी 9431Corona रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 3,75,799वर


राज्यात आजही उच्चांकी 9431Corona रुग्णांची भर, एकूण संख्या गेली 3,75,799वरआज राज्यात 9 हजार 431 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 6044 रुग्ण डिस्चार्ज मिळाला आहे. आज 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.(9 thousand 431 new patients) त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 375799 वर गेली आहे. मृत्यूचा आकडा 13656 एवढा झाला आहे. मुंबईत आज 1101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 109161 झाली आहे.
राज्यात सध्या 3.63 % मृत्युदर आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 56. 74 टक्के एवढे झाले आहे. तर  ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17738 एवढी झाली.
पुणे विभागातील 48  हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 84 हजार 455  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 33  हजार 649  आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 351  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  921 रुग्ण गंभीर असून उर्वरीत (9 thousand 431 new patients)निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.78  टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Must Read


देशात 24 तासांत 64% रुग्ण बरे झालेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 36,000 पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात (9 thousand 431 new patients)आला आहे. त्यामुळे रुग्णांचा वाढत आकडा पाहून घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाला हरवणं शक्य आहे, हे या रिकव्हरी रेटवरून दिसून येतं. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण निरोगी झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे केंद्राची चिंता वाढली आहे. महिनाभरात ही संख्या कमी व्हायला लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र कोरोना हा काही लगेच जाणारा आजार नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. PMOच्या नेतृत्वात काही तज्ज्ञांचे गट त्यावर अहवाल तयार करत असून त्यांच्या अहवालानंतर सरकार मोठे निर्णय घेणार आहे.
उपचाराची दिशा, औषधं, नव्या आरोग्य सुविधा, संशोधनासाठीचे उपाय, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, अर्थचक्र  पुन्हा रुळावर आणणे अशा सगळ्याच गोष्टींवर हे तज्ज्ञ शिफारशी करणार असून त्यानंतर सरकार प्रत्येक विभागासाठी दूरगामी निर्णय घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या टास्क फोर्सच्या कामकाजाबद्दल माहिती घेत असून ते सगळे अहवाल थेट पंतप्रधानांना दिले जाणार आहेत.
31 जुलै रोजी अनलॉक-2 (Unlock 2.0) संपणार आहे, त्यानंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलॉक-3 बाबत सरकार सध्या विचार करत आहे. याअंतर्गत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सिनेमागृह सुरू केली जाऊ शकतात. सूचना प्रसारण मंत्रालयाने याबाबत गृह मंत्रालयाला एक पत्र पाठवले आहे, यात सिनेमागृह खुली करण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.
यापूर्वी माहिती प्रसारण मंत्रालय आणि सिनेमा हॉल मालकांमध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिनेमा हॉल मालकांनी(9 thousand 431 new patients) 50 टक्के प्रेक्षकांसह थिएटर सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. सुरुवातीला 25 टक्के जागा आणि नियमांचे काटेकोर पालन करून सिनेमा हॉल सुरू करावे, अशी मंत्रालयाची इच्छा आहे. एवढेच नाही तर अनलॉक -3 मधील सिनेमा हॉलसोबत जिम देखील उघडण्यात येण्यावर चर्चा सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा आणि मेट्रो उघडण्याच्या दृष्टीने विचार केला गेला नाही.