Main Featured

चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट


locust swarms from somalia to india in next 2 weeks fao warns | चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकटकोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. व्हायरसच्या संकटाने आव्हान उभं केलं असतानाच आता आणखी एक मोठं संकट देशावर येत असल्याची माहिती समोर आली आहे. देशात टोळधाड धडकणार असल्याची चिंताजनक माहिती मिळत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा देशात टोळधाडीचं संकट येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने दिला आहे. 
येत्या दोन आठवड्यांमध्ये पुन्हा एकदा भारतावर टोळधाडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण होऊ शकतं. पश्चिमेकडून चार हजार किलोमीटर दूरवरून हा टोळधाडीचा हल्ला सुरू झाला आहे. मान्सूनपूर्वी मे महिन्यात टोळधाड दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातून राजस्थानात दाखल झाली. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरले आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमेवरून मोर्शी, वरूड व मेळघाटात टोळधाड दाखल झाली. वाळवंटी टोळांनी राज्यातील 20 जिल्ह्यांतील 90 हजार हेक्टरवरील पिके फस्त केली. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात टोळधाडीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.