Main Featured

'दिल बेचारा' पाहून क्रिती सेनॉन म्हणाली, It's not Seriसुशांतसिंह राजपूतचा (#sushantsinghrajput) अखेरचा दिल बेचारा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला. त्याचा हा सिनेमा पाहून सुशांतला ओळखणारे आणि त्याचे चाहते फारच भावुक झाले आहेत. सिनेमा पाहताना प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. 

आता क्रिती सेनॉननेही सिनेमा पाहून झाल्यावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. क्रितीने पोस्टमध्ये लिहिले की, (Kriti sanon post instagram post after watching dil bechara)सिनेमा पाहून पुन्हा एकदा जीव तुटला. क्रिती म्हणाली की,क्रिती मॅनीला पाहताना अनेककदा असं जाणवलं की सुशांत पुन्हा एकदा जीवंत झाला.Must Read'दिल बेचारा'
(#DilBechara) सिनेमातील त्याच्या फोटोंची एक क्लिप शेअर करताना क्रितीने लिहिलं की, 'हे बरोबर नाहीये. (Its not seri) आणि हे कधीही ठीक होणार नाही... पुन्हा एकदा माझं हृदय तुटलं. मॅनीमध्ये मला अनेक क्षणांत तू जीवंत झाल्यासारखं वाटलं. या व्यक्तिरेखेत तू स्वतःला कुठे झोकून दिलं असशील याची मला कल्पना आहे. नेहमीप्रमाणे तुझ्या शांत राहण्यातच तुझी जादू होती.. त्या क्षणांमध्ये तू काहीच बोलला नाहीस पण खूप काही सांगून गेलास..


क्रितीने (Actress Kriti sanon) पुढे लिहिले की, 'मुकेश छाब्रा मला पूर्ण कल्पना आहे की आम्ही जो विचार केला, तुझ्यासाठी त्याहून अनेक पटीने जास्त स्पेशल आहे. तू पहिल्याच सिनेमात आम्हा सर्वांना भावुक केलं. संजना सांघी तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.' दिल बेचारा या सिनेमातून अभिनय क्षेत्रात संजनाने आणि दिग्दर्शन क्षेत्रात मुकेशने पदार्पण केलं.