Main Featured

कोल्हापुराकराना हे नियम पाळावे लागणारकोल्हापुरातला लॉकडाऊन मध्यरात्रीपासून शिथील, हे नियम पाळावे लागणारकोल्हापूर जिल्ह्यातला लॉकडाऊन आज मध्यरात्रीपासून शिथील होणार आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरची नवी नियमावलीही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. नव्या नियमांनुसार दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. तसंच शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योगधंदे आणि एमआयडीसी ५० टक्के कर्मचाऱ्यांमध्येच सुरू ठेवता येणार आहे. 
सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रिक्षा वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे, पण शॉपिंग मॉल, मार्केट तसंच केस कर्तनालय मात्र बंदच राहणार आहेत. खाजगी तसंच धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी कायम आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. कोल्हापुरात ६० वर्षांवरील दुकानांचे माल, कर्मचारी तसंच ग्राहक यांना घराबाहेर पडता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांचा हा नवा आदेश ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.