Main Featured

कन्नड चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्याने केली आत्महत्या


कन्नड अभिनेता सुशील गौडाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने कर्नाटकमधील त्याचे मूळ गाव मंड्या (Mandya) येथे राहत्या घरात आत्महत्या केली आहे. वयाच्या ३०व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुशीलने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेले नाही. त्याने कन्नड मालिका अंथपूरामध्ये काम केले होते. तसेच तो एक फिटनेस ट्रेनर देखील होता. सुशील लवकरच Salaga या चित्रपटात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार होता. पण चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच सुशीलने जगाचा निरोप घेतला आहे. या चित्रपटात अभिनेता दुनिया विजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सुशीलच्या जाण्याने दुनिया विजयने सोशल मीडिया पोस्टद्वारे दु:ख व्यक्त केले आहे. ‘मी जेव्हा पहिल्यांदा सुशीलला पाहिले तेव्हा मला तो हिरो मटेरियल वाटला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो आम्हाला सोडून गेला. आत्महत्या करणे हे कोणत्याही समस्येवर उपाय नसतो’ असे त्याने म्हटले आहे.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता. सुशांतने नैराश्यामध्ये आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.