Main Featured

सुशांतसोबत काम करण्यासाठी कंगनाने दिला होता नकारBollywood actress kangana ranaut

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput Suicide) निधनानंतर अभिनेत्री कंगना रणौतने घराणेशाही या वादावर तिचे मत मांडले. तसेच आता कंगनाने एका मुलाखतीमध्ये सुशांतसोबत काम करण्याची संधी मिळाली होती पण तिने त्या चित्रपटाची ऑफर नाकारली असल्याचा खुलासा केला आहे.

Must Read
बॉलिवूड चित्रपट निर्माते होमी अदजानिया हे २०१७मध्ये एका रोमँटीक चित्रपटासाठी सुशांत सिंह राजपूत आणि कंगना रणौतला (Bollywood actress kangana ranaut) मुख्य भूमिकेसाठी साइन करु इच्छित होते. पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही याचा खुलासा कंगनाने  दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. ‘मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा होमी यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले होते. मी त्यांच्या ऑफिसला जायला निघाले तितक्यात हृतिक रोशनने (Actor Hritik Roshan) मला कायदेशीर नोटीस पाठवली’ असे कंगना म्हणाली.
‘गोंधळलेल्या स्थितीमध्ये मी होमी यांच्याकडे गेले. त्यांनी मला त्यांच्या आगमी चित्रपटाविषयी सांगितले. त्यावेळी मला त्यावर लक्ष देता आले नाही कारण मी त्या नोटीशीमुळे खूप गोंधळले होते. मी होमी यांना पुन्हा येईन असे म्हटले होते. पण त्यावेळी माझ्या मानसिक स्थितीबद्दल कोणालाच माहिती नव्हती. त्यानंतर एक वर्षभर मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. मी त्यावर्षी कोणताच चित्रपट साइन केला नाही. पण मला त्या चित्रपटाची कथा लक्षात आहे’ असे कंगना (Bollywood actress kangana ranaut)  पुढे म्हणाली.
‘ती एक शहरातील जोडप्याची लव्हस्टोरी होती. आता जे काही झाले त्यानंतर मला असे वाटले की, जर मी त्या चित्रपटात सुशांतसोबत काम केले असते तर आमचे आयुष्य बदलले असते? मला नाही माहित’ असे कंगना म्हणाली.