Main Featured

विद्यार्थी-पालकांनो, धावपळ नको! ज्युनिअर कॉलेजचा प्रवेशही ऑनलाइन


Junior college admissions are also online for ssc students

दहावीचा निकाल लागला, आता अकरावी प्रवेशासाठी धावपळ‌ सुरू होईल... धावपळ? यंदा हा शब्द बाजूला ठेवावा‌ लागणार आहे. कारण अकरावीचा कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेश देखील ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांना संकेतस्थळाद्वारे प्रवेश निश्चित‌‌ करण्याची तयारी केली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. एका‌ ठिकाणी गर्दी करायची नाही. त्यामुळे प्रवेश देखील ऑनलाइन होणार आहेत. अकरावीचे‌ प्रवेश हे दरवर्षी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होतात.(Eleventh Admission online) याद्वारे विद्यार्थ्याला प्रवेशासाठी महाविद्यालय मिळते. नंतर विद्यार्थ्याला स्वत: संबंधित महाविद्यालयात जाऊन त्या महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज आणि शुल्क भरावे लागत होते.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याला कनिष्ठ महाविद्यालयात‌‌ जाण्याची गरज नाही. केंद्रीय‌ प्रवेश प्रक्रियेत‌ विद्यार्थ्याला कनिष्ठ महाविद्यालय मिळाल्यानंतर त्याचे नाव ऑनलाइन पद्धतीने संबंधित महाविद्यालयाकडे‌ जाईल. त्यानंतर महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याला सूचना‌ दिल्या जातील. विद्यार्थ्याने त्या‌ महाविद्यालयाच्या‌ संकेतस्थळावर जाऊन त्याचा‌ प्रवेश अर्ज भरायचा, तसेच प्रवेश शुल्क भरले की त्याचा‌ प्रवेश निश्चित‌ होईल. विद्यार्थी‌ मागास प्रवर्गातील असेल, तर त्याची‌ कागदपत्रे देखील तो दहावीत‌ असलेल्या शाळेकडून वा मार्गदर्शन केंद्रांकडून ऑनलाइन पद्धतीनेच तपासून दिली जाणार .(Eleventh Admission onlineआहेत. विद्यार्थी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील असेल, तर अकरावीचा ऑनलाइन अर्ज भरताना त्याला‌ हद्दीबाबत‌ विचारणा केली जाईल. विद्यार्थी बाहेर गावचा असेल, तर त्याला मार्गदर्शन केंद्राची‌ यादी‌‌ दिसेल. त्याने एखादे‌ केंद्र निवडले‌ की विद्यार्थ्याने अपलोड केलेली कागदपत्रे त्या‌ केंद्राकडे ऑनलाइन तपासणीसाठी जातील. त्यात‌ त्रुटी असतील, तर संबंधित‌ केंद्र विद्यार्थ्याशी मोबाइलवर संपर्क करतील. ही सर्व प्रक्रिया घरात‌ बसूनच करायची असल्याने विद्यार्थी‌ वा त्याच्या‌ पालकांना धावपळ करण्याची‌ गरज राहणार नाही.
Must Read

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलिप सेठ यांनी सांगितले, कि ''केंद्रीय‌ प्रक्रियेत कनिष्ठ महाविद्यालय मिळल्यानंतर पूर्वी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन घ्यावा लागणारा प्रवेश यंदा ऑनलाइन पद्धतीनेच होईल. त्यासाठी विद्यार्थ्याने महाविद्यालयात‌ येण्याची.(Eleventh Admission online‌ गरज नाही. बहुतांश महाविद्यालये हे प्रवेश त्यांच्या‌ संकेतस्थळाद्वारे करणार आहेत. आम्ही देखील‌‌‌‌ त्यासाठी शिक्षकांची‌ टीम‌ तयार केली आहे. प्रवेश शुल्क देखील ऑनलाइन पद्धतीनेच घेतले जाईल.''
सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर 'सकाळ'शी बोलताना म्हणाल्या, "कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशासाठी बोलावू नये. कॉलेजमध्ये गर्दी होऊ नये, रांगा लागू नयेत, याची‌ खबरदारी घेण्याच्या‌ सूचना दिलेल्या आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश हे त्यांच्या‌ संकेतस्थळावर अर्ज भरून करावे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया‌ समितीकडून प्रवेशित विद्यार्थ्यांची‌ यादी महाविद्यालयास‌‌ जाईल. त्यावर त्यांचे मोबाइल क्रमांक असतील. त्यानुसार .(Eleventh Admission onlineविद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रूप तयार करून त्यांना प्रवेशाविषयी सूचना कराव्यात. कनिष्ठ महाविद्यालयाचे संकेतस्थळ नसेल, तर गुगल डॉक्सद्वारे त्यांचे प्रवेश अर्ज भरून घ्यावेत. प्रवेश शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरून घ्यावे."