Main Featured

आयपीएलच्या टीम झाल्या बेघर!


IPL 2020 to start on September 19, final on November 8: Report ...भारतातील लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीग  टी-20 स्पर्धा यंदाच्या हंगामातील बिगूल संयुक्त अरब अमिरातमध्ये वाजणार हे स्पष्ट झाले. वेळापत्रक निश्चितीला अवकाश असला तरी आयपीएलच्या परंपरेनुसार सामन्याची सुरुवात ही गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीने होईल. या स्पर्धेत गतविजेत्याच्या घरच्या मैदानावर सलामीची लढत आणि अखेरचा सामना असे चित्र आपण आतापर्यंत पाहिले आहे. 2009 आणि 2014 या नियमाला अपवाद ठरला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परदेशी मैदानात स्थलांतरित करावी लागली होती. 2009 चा संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत तर 2014 च्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सामने आबू-धाबी, शारजहा  आणि दुबई या मैदानात खेळवण्यात आले होते. 
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा हंगाम परदेशात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची इन मिन तीनच मैदाने आहेत. त्यामुळे पर मुलकात खेळताना आठ संघांना घरच्या मैदानाचा वारसा खालसा झाल्याचे चित्र यंदाच्या हंगामात पाहायला मिळेल. आयपीए स्पर्धेतील साखळी सामन्यात  प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर एक आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर एक अशा पद्धतीने 14 सामने खेळतो. 'पर मुलकात' होणारी स्पर्धा 51 दिवांची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर  सामन्याच वेळापत्रक पूर्वी प्रमाणे असू शकेल असे वाटते. पण प्रत्येक संघाला घरचे मैदान ठरवून देणे शक्य होणार नाही. त्यामुळे याठिकाणी खेळणाऱ्या संघाना बेघर व्हावे लागणार आहे, असेच म्हणता येईल.
यापूर्वी 2014 मध्ये संयुक्त अमिरातमध्ये पहिल्या टप्प्यात 19 सामने खेळवण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेचा विचार केल्यास या स्पर्धेत 51 दिवसांत 56 सामन्याचे नियोजन असते. मैदान बदलून जशीच्या तशी स्पर्धा भरवण्यासाठी तीन मैदानात जवळपास तिप्पट सामने खेळवायचे कसे? याचा विचार आयपीएलच्या गव्हर्निर बॉडीसमोर मोठा प्रश्न असेल. यापूर्वी सामने कमी करुन स्पर्धा पार पाडण्याची तयारीही बीसीसीआयने दर्शवली होती. पण तारखा पाहिल्या तर स्पर्धा पूर्ण 51 दिवस खेळवण्याचा आराखडा आखल्याचे दिसते. तीन मैदानात जवळपास 56 सामने खेळवणे ही सोपी गोष्ट नाही. यासाठी खेळपट्टीवर मोठी मेहनत घ्यावी लागेल.
2009 मध्ये संपूर्ण स्पर्धा परदेशात खेळवण्यात आली होती. यावेळी विजेता हा परदेशी कर्णधार असलेला संघ ठरला होता. एडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखालील डेक्कन चार्जर्सने जेतेपद पटकावले होते.  त्यामुळे यंदाच्या हंगामात तो फ्लॅशबॅक दिसणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. सध्याच्या घडीला रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हे सर्वाधिक वेळा जेतेपद मिळवण्यात आघाडीवर असलेले संघ आहेत. परदेशात स्पर्धा खेळून बेघर झालेल्या संघात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व हे स्टिव्ह स्मिथकडे असून सनरायझर्स हैदराबादची कमान ही डेव्हिड वॉर्नर याच्याकडे आहे. या दोघांना दक्षिण आफ्रिकेतील पुनरावृत्ती करुन परदेशात परदेशी कॅप्टनचा डंका वाजवून दाखवायला जमणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कमालीचा योगायोग म्हणजे 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली डेक्कन चार्जर्सने बाजी मारली होती. आताही दोन ऑस्ट्रेलियन कर्णधारांकडे ही संधी असेल.